उपाध्यक्षपदी लक्ष्मी अष्टेकर, दोन्ही जागा बिनविरोध
वार्ताहर / किणये
अष्टे ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अध्यक्षपदी मलिकसाब मुल्ला तर उपाध्यक्षपदी लक्ष्मी अष्टेकर यांची निवड करण्यात आली
आहे. या ग्राम पंचायतीमध्ये एकूण 17 सदस्य आहेत. हे सर्व सदस्य या निवडणुकीला उपस्थित होते. यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाली. यावेळी अरविंद कारची उपस्थित होते. त्यांनी नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांचा सत्कार केला. निवडणूक अधिकारी म्हणून नायकर होते.