खानापूर : माजी सैनिक संघटना आर्मी, नेव्ही व एअरफोर्सतर्फे तालुका संघटनेची मासिक बैठक जांबोटी क्रॉस येथील संघटनेच्या कार्यालयात अध्यक्ष पांडुरंग मेलगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
प्रारंभी मागील बैठकीचा आढावा घेतला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सर्व सदस्यांनी दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता जांबोटी क्रॉस येथील संघटनेच्या कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष पांडुरंग मेलगे यांनी केले आहे. बैठकीमध्ये नवीन सामील झालेले तीन सदस्य प्रकाश नारायण देसाई (कापोली के. जी), सोमाण्णा रवळू पाटील (तिवोली), कैतान डिसोजा (कारलगा) यांचा सत्कार केला. त्यानंतर त्यांच्या पुढील भविष्यासाठी संघटनेच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सेक्रेटरी धाकलू हेब्बाळकर यांनी सर्वांचे आभार मानले.