वृत्तसंस्था/ नुर सुल्तान
कझाकस्तानमध्ये झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील अस्ताना आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत बेल्जियमच्या 27 वर्षीय ऍलिसन व्हान युत्वान्कने एकेरीचे अजिंक्यपद मिळविताना रशियाच्या युलिया पुतिनसेव्हाचा पराभव केला.
शनिवारी झालेल्या या स्पर्धेतील एकेरीच्या अंतिम सामन्यात युत्वान्कने पुतिनसेव्हाचा 1-6, 6-4, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव केला. युत्वान्कचे डब्ल्यूटीए टूरवरील हे पाचवे विजेतेपद आहे. महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत युत्वान्क सध्या 89 व्या स्थानावर आहे. 2019 च्या सप्टेंबरमध्ये युत्वान्कने आपली शेवटची स्पर्धा ताश्कंदमध्ये जिंकली होती.