प्रतिनिधी /कोल्हापूर
अखिल भारतीय हिंदू महासभेने कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप यांनी दिली. निवडून येण्याची क्षमता असणाऱया उमेदवारांना उमेदवारी हेच धोरण हिंदू महासभा राबविणार असून समाजात प्रतिष्ठा असणाऱया उमेदवारांनी संपर्क साधावा. सावरकर यांच्या विचारांना राजकारणात स्थान द्यावे, असे आवाहनही सोरप यांनी केले आहे. इच्छुकांनी मनोहर सोरप अथवा संजय कुलकर्णी यांच्याशी शिंदे गल्ली, मंगळवार पेठ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.