बेळगाव
कलघटगी (गुलबर्गा) येथे होणाऱया राज्यस्तरीय आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघाची निवड चाचणी पार पडली. चाचणीनंतर जिल्हा संघासाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली.
ही स्पर्धा 28 ते 30 डिसेंबर या कालावधीत होणार असून त्यासाठी टिळकवाडीतील लेले मैदानावर निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. नोंदणीकृत सर्व 16 क्लब्सच्या 51 खेळाडूंनी या चाचणीत भाग घेतला होता. त्यातून 27 खेळाडूंची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यातून 18 खेळाडूंचा अंतिम संघ 25 डिसेंबर रोजी निवडला जाणार आहे. त्याचप्रमाणे संघव्यवस्थापक, कर्णधार, प्रशिक्षक यांचीही निवड केली जाणार आहे. बीडीएफए अध्यक्ष पंढरी परब, पॅट्रन राम हदगल, सचिव अमित पाटील, अल्लाबक्ष बेपारी, बेंगळूर प्रतिनिधी व्हिक्टर परेरा यांच्या उपस्थितीत निवड चाचणी घेण्यात आली.