तरुण भारत संवाद सोलापूर / प्रतिनिधी
सध्या सोलापूर जिल्ह्यासह देशभरात कोरोनाचा हा प्रादुर्भाव वाढत आहे. दुसरीकडे ऑक्सिजनची मोठी टंचाई भासत आहे. याच भयानक वास्तव आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार सचिन खरात यांनी आपल्या कुंचल्यातून नागरिकांची ऑक्सीजन साठी कशी धडपड सुरू आहे अशी परिस्थिती दाखवली आहे. हे चित्र साकारण्यासाठी तब्बल पाच तासांचा अवधी लागला असल्याचे चित्रकार खरात यांनी सांगितले.
चित्रकार सचिन खरात यांनी काढलेले हे चित्र नव्हे तर सध्याच्या भयंकर परिस्थितीची माहिती देणारे एक वास्तव आहे. या चित्रातील नायक म्हणजे ऑक्सिजनच्या सिलेंडर आहे तो मिळावा म्हणून लोकांची धडपड दिसून येत आहे. तर दुसरीकडे ते पाहून एका झाडांनी स्वतः मधील सर्व ऑक्सीजन देऊन टाकल्याचे वास्तवदर्शी चित्र आहे. प्राणवायूसाठी ताकद असणार्यांनी शिडी लावली, पोच असणारे वरपर्यंत पोहोचले मात्र ज्यांना धडपड करूनही ऑक्सीजन मिळालं नाही सरळ स्मशानाचा रस्ता धरलेला अशा प्रकारचे वास्तवदर्शी चित्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार सचिन खरात यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काढले आहे