प्रतिनिधी/ रत्नागिरी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे मंडणगड तालुक्यातील मुळगाव आंबडवे येथील स्मारकास जिल्हा परिषद समाजकल्याण सभापतीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर सभापती परशुराम कदम यांनी प्रथमच भेट दिली. ग्रामस्थांनी स्मारकासमोर सभामंडप उभे करुन देण्याची असलेली मागणी लवकरात लवकर पुर्ण करण्याचे आश्वासन कदम यांनी यावेळी दिले आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती परशूराम कदम यांनी 24 ऑक्टोंबर रोजी दिलेल्या भेटीप्रसंगी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती विनोद झगडे, जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, सभापती स्नेहल सकपाळ, विस्तार अधिकारी मोहीते उपस्थित होते.
याचबरोबर निसर्ग चक्री वादळाचे कालवाधीत गावातील अंगणवाडी व आरोग्य उपकेंद्राचे सार्वजनिक इमारतीची मोठी दुरावस्था झाली. याबाबत या इमारती लवकरात लवकर दुरुस्त व्हाव्यात यासाठी ग्रामस्थ आग्रही आहेत. या इमारतींचे दुरुस्तीकरिता जिल्हा परिषदेकडून एक लाखाचा निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे यांनी यावेळी जाहीर केले. या कार्यक्रमास ग्रामस्थ सुदाम सकपाळ, गणपत सकपाळ, मारुती काप, शैलेश पोस्टुरे, विनायक येसरे, निलेश सकपाळ, अमोल सकपाळ, विशाल येलवे, दयानंद सकपाळ, आनंत सकपाळ, मनिषा सकपाळ, उर्मिला सकपाळ, मधुकर सकपाळ नरेंद्र सकपाळ उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमांचे सुत्रसंचालन नरेंद्र सकपाळ यांनी केले.