डिसेंबर महिना सुरू झाला की आपल्याला नव्या वर्षाचे वेध लागतात. ख्रिसमस, नव्या वर्षात पाटर्य़ांची धूम असते. यंदा सर्वच सणांवर आणि समारंभांवर कोरोनाचं सावट असलं तरी पुरेशी काळजी घेऊन आपण एंजॉय करू शकतो. या प्रसंगी ट्रेंडी वेस्टर्न आउटफिट्स छान दिसतात. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होताना नव्या कपडय़ांची खरेदी करण्याचा विचार मनात असेल तर या पर्यायांचा विचार करता येईल.
* ख्रिसमस पार्टीला कॅज्युअल वेअर कॅरी करायचं असेल जीन्स आणि शर्ट हा खूप चांगला ऑप्शन आहे. सॅटिन शर्ट आणि काळ्या जीन्समध्ये तुम्ही खूप छान दिसाल. जीन्ससोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या पँट्सही बाजारात आल्या आहेत. या पँटवर टॉप घालून तुम्ही मिरवू शकता. सोबत ट्रेंडी ऍक्सेसरीजही कॅरी करता येतील.
* सेमी फॉर्मल ड्रेस कोड असल्यास मॅक्सी ड्रेस ट्राय करता येईल. नी लेंग्थ किंवा पायघोळ मॅक्सी ड्रेस घालता येईल.
* सध्या शिमरी ड्रेसचा ट्रेंड आहे. बॉलिवूडमधील बर्याच अभिनेत्री शिमरी ड्रेस घालताना दिसतात. तुम्हीही झगमता ड्रेस घालू शकता.
* नाताळ, नववर्षाला लाल रंगाचे कपडे घातले जातात. तुम्हाला लाल रंग आवडत नसेल तर मरुन रंगाचा ड्रेसही ट्राय करता येईल.
* काळ्या रंगाचे कपडेही परिधान करता येतील.
* या दिवसात थंडी असते. तुम्ही लेअरिंगचा पर्यायही निवडू शकता. श्रग्ज, जॅकेट्सने लूक खुलवू शकता.