मोरजी/ प्रतिनिधी
आगरवाडाचोपडे पंचायतीच्या सरपंच पदी श्री भगीरथ पंढरीनाथ गावकर यांची आज बिनविरोध निवड झाली.सरपंच सौ. प्रमोदीनी आगरवाडेकर अलिखित करारानुसार सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.त्यासाठी सोमवार 27 रोजी निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच सौ. समिता सिताराम राऊत यांनी पंच श्री भगीरथ पंढरीनाथ गावकर यांचे नाव सरपंच पदासाठी सुचवले त्यांना माजी सरपंच सौ.प्रमोदीनी प्रमोद राऊत यांनी अनुमोदन दिले .सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निर्वाचन अधिकारी श्री फटुसिंग शेटगावकर यांनी निर्धारित वेळे नंतर श्री भगीरथ पंढरीनाथ गावकर यांची सरपंच म्हणून निवड घोषित केली पंचायत सचिव रमेश मांदेकर यांनी त्यांना सहाय्य केले..आज सोमवारी सकाळी पंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीला उपसरपंच सौ. समिता राऊत,माजी सरपंच सौ. प्रमोदिनी आगरवाडेकर ,सौ.संगीता नाईक ,पंच भगीरथ गावकर,प्रमोद गावकर,नितीन चोपडेकर ,सौ. नीलम अनिल शेटय़? मसुरकर आदी सातही पंच उपस्थित होते.
सरपंचपदी निवड झाल्यानंतर श्री भगीरथ गावकर म्हणाले,आमदार दयानंद सोपटे यांच्यामुळेच मी सरपंच होवू शकलो यापुढे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आगरवाडा चोपडे पंचायतीत अपूर्ण राहिलेली विकास कामे पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन प्रामुख्याने आगरवाडा चोपडे पंचायत कचरा मुक्त करण्यासाठी मी प्राधान्य देईन स्वच्छगोवा स्वच्छभारत ही संकल्पना वाढीस लावून आत्मनिर्भर पंचायत घडवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहीन असे सांगितले . श्री भगीरथ गावकर यांची सरपंच पदी निवड झाल्याबद्दल श्री आमदार दयानंद सोपंटे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.