मयत मेल्विन डिसोझा कुटुंबियांची मागणी
वार्ताहर /हरमल
गिरकरवाडा येथील जीवरक्षक मेलविन डिसोझा यांनी कंपनीच्या वरिष्ट अधिकारी शांताराम राणेंच्या सतावणुकीमुळे आत्महत्या केली. यामुळे अधिकारी राणे यांना त्वरित निलंबित करावे व कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. अन्यथा आम्ही आवाज उठविणार,असा इशारा कुटुंबियांनी केली आहे.
मेलविन जुनसवाडा टॉवरच्या सेवेत जीवरक्षक म्हणून गेली 10 वर्षे सेवा बजावत होते. त्या काळात त्यांनी चांगले काम केले होते. दृष्टी कंपनीचे वरि÷ अधिकारी शांताराम राणे यांच्याकडे त्यांनी रजा मागितली होती. रविवारी 26 रोजी, मेलविन व सर्व मित्र वेलांकनी मद्रासला निघणार होते. मात्र अधिकारी राणे यानी मेलविन यांची रजा नामंजूर केली. वास्तविक जुनसवाडा टॉवर मध्ये अनेक अतिरिक्त कर्मचारी असून त्यांच्या सेवेबद्दल आक्षेप घेण्यासारखे खूप गोष्टी आहेत. परंतु मेलविन यास मद्रासला जाण्यास परवानगी नाकारल्याने त्यानी घरी धाव घेतली व चिठ्ठी लिहून पँटच्या खिशात ठेवली व घरातील स्नानगृहात गळफासाने आत्महत्या केल्याचे बहीण ऑफेलिया डिसोझा यांनी सांगितले.सदर अधिकारी राणे याला त्वरित कामावरून काढून टाकावे व मेलविन यांच्या कुटुंबास आर्थिक हातभार द्यावा असे ऑफेलिया हिने सांगितले.
त्या चिठ्ठीत ,तो (राणे)आपल्याच माणसांना सांभाळून घेतो,आम्हाला दुययम वागणूक देत असतो,असे लिहून ठेवल्याचे ओफेलिया हिने सांगितले.
दृष्टीच्या सेवेत कार्यरत असताना दुपारच्या जेवणास एक तासांची सुट्टी होती.त्या अवधीत जेवण आटोपून कामावर रुजू होण्याची गरज असते.मात्र कामावरून घरी पोचायच्या अगोदरच सदर अधिकारी त्याला फोन करून बोलावून घ्यायचा, नीटपणे जेवण घ्यायला वा हात धुवायला सुद्धा वेळ देत नसे एवढी सतावणुक चालली होती,असे मयत मेलविन यांची आई रोफिना डिसौझा यांनी सांगितले.
आमच्या वाडय़ावरील अनेक युवक दृष्टी कंपनीत कामाला होते.कित्येकांना सतावणुक करून त्यांना नकोसे करण्यात अधिकारी वावरत होते.मात्र अशी परिस्थिती अन्य कोणावरही येऊ नये असे म्हणावेसे वाटते.आमची मेलविन यांच्याप्रति सहानभूती असून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिक आलेसिन रोद्रीगिश यांनी केली आहे.ज्या मंडळीनी ह्या प्रकारास मूक समंती दिली, जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.आपणास कामावरून कमी करण्याची शक्मयता असल्याचे मेलविन यांनी आईला सांगितले होते.
ही दुसरी घटना-
एक दोन वर्षांपूर्वी ह्या टॉवरवरील एका कर्मचाऱयाने आत्महत्या केली होती.त्यावेळेस त्यानीही सदर अधिकाऱयाचे नाव दिले होते.पोलिसांनी त्या अधिकाऱयास बोलावून घेत जबाब नोंदविला, मात्र कारवाई झाली नव्हती असे जेम्स डिसौझा यांनी सांगितले.
परवाच्या घटनेनंतर आम्ही टॉवरला भेट दिली असता,राणे रजेवर असल्याचे खोटे सांगितले. मात्र अधिकारी गौरेश सावंत जेव्हा मेलविन यांच्या निवासस्थानी आले असता, आम्ही मित्रांनी राणेंशी संपर्क करण्याची विनंती सावंत याना केली.त्याना, राणे यांनी आपण टॉवरवर दुपारी 3.30 पर्यत होतो असे सांगितले. मात्र आम्हा मित्रांना त्यांनी खोटी माहिती का दिली,असा सवाल जेम्स यांनी व्यक्त केला.सदर अधिकारी धादांत खोटे बोलत असून जबाबदारी झटकण्याची गेम करीत असून तीच मंडळी मेलविन यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे युवकांनी सांगितले.
दृष्टीचे कर्मचारी दारूच्या आहारी
दृष्टी कंपनीचे कर्मचारी नेहमीच दारूच्या नशेत वावरत असतात.पाच-सहा महिन्यांपूर्वी सकाळी 10 च्या आसपास, गिरकर वाडय़ावरील माश्चिमार होडी बुडाली होती त्यावेळेस जीवरक्षक कोणीही डय़?टी वर नव्हते,नेहमीच सकाळी उशिराने डय़?टीवर येत असल्याचे एडी डिसौझा यांनी सांगितले.याबाबत ची लेखी तक्रार पेडणे पोलिस स्थानकांत दिली असल्याचे त्यानी सांगितले.
तरी जीवरक्षक आत्महत्या प्रश्नी पर्यटनमंत्री बाबू आजगावकर, मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी न्याय द्यावा व गरीब कुटुंबास आधार द्यावा अशी मागणी केली आहे.
मयत मेलविनने 25 रोजी अर्धा दिवस रजा घेतली होती.त्यादिवशी सुमारे 3 वाजता त्याला बोलावल्याने तो स्कुटरवरून गेला.तत्पूर्वी त्याने शेजारच्या मुलाकडे 500 रुपये दिले व कोलगेट,साबण,ब्रश वगैरे आणण्यासाठी पाठवले होते.साधारण 4 च्या सुमारास मेलविन घरी परतला व थेट संडासमध्ये गेला व तिरमिरत त्यांनी गळफास लावून घेतला.रविवारी सकाळी 5 वाजता मित्रमंडळीसह मद्रासला वेलांकनी देवीला निघणार होते,असे त्याचे मित्र आयरिश डिसौझा यानी सांगितले.