प्रतिनिधी/ बेळगाव
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रविवारी शहापूरच्या आचार्य गल्ली भागात आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक रोग प्रतिकार शक्तीवर्धक गोळय़ांचे वाटप करण्यात आले. शिवाजी हंडे, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, राजु भातकांडे, अशोक घगवे, नारायण पाटील यांच्या हस्ते नागरीकांना गोळय़ा वितरित करण्यात आल्या.
शहर समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाने व सरचिटणीस किरण गावडे यांच्या नेतृत्वाखाली शहरात या गोळय़ा वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रविवारी आचार्य गल्ली येथे हा उपक्रम राबविण्यात आला. रोगप्रतिकार शक्ती वाढावी व नागरीकांचे आरोग्य तंदरूस्त रहावे यासाठी या होमिओपॅथिक गोळय़ांचे वितरण केले जात आहे. डॉ. सुरेश चौगुले यांनी यावेळी नागरीकांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला शेखर हंडे, अनिल माळवी, शिवाजी बाचीकर, प्रकाश भेकणे, सोमनाथ पाटील, शिव युवा संघटनेचे कार्यकर्ते राजू पाटील, आकाश भेकणे, बसवंत पोटे, विनोद माळवी, धनाजी बेकणे, रवि देसाई, शुभू हंडे कन्हैय्या हंडे, अनंत बाचीकर, अलका भेकणे, स्नेहा हंडे, रूपा भेकणे, रेणुका पाटील, सुनिता माळवी, गीता भेकणे, स्वाती भेकणे यासह इतर नागरीक उपस्थित होते.