मेष: जुने वाद उकरून काढू नका, निष्कारण मनस्ताप होईल.
वृषभः मंगलकार्यासाठी प्रवास केल्यास फायदेशीर ठरेल.
मिथुन: कर्ज प्रकरणात मध्यस्थी कराल पण तुम्ही अडकून बसाल.
कर्क: रखडलेले कोणतेही काम स्वतः करा मनासारखे यश मिळेल.
सिंह: आपुलकीच्या वागणुकीमुळे परस्परातील स्नेहभावना वाढेल.
कन्या: शक्यतो नवे न घेता जुनी कामे पूर्ण करा.
तुळ: ताण वाढेल पण सर्व कामात यश मिळेल.
वृश्चिक: योग्य व्यक्तीशी मैत्री करावी, फायदेशीर ठरेल.
धनु: कुणाशी शत्रुत्व करू नये, यश मिळणार नाही.
मकर: आर्थिक बाबतीत फसवणुकीचा योग.
कुंभ: धनलाभासाठी प्रयत्न करावेत, हमखास यश मिळेल.
मीन: नवीन कोणताही व्यवसाय करा, यशस्वी व्हाल.