प्रतिनिधी/ पणजी
कदंब महामंडळाने कोविड-19 लॉकडाऊनच्या नियमांनुसार गेल्या काही महिन्यांपासून आंतरराज्य बस सेवा बंद ठेवली होती. आज दि. 5 सप्टेंबरपासून कंदब महामंडाळाने कर्नाटक राज्यात ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकाची गोव्यातील बसवाहतूक गुरुवारपासून सुरु झाली आहे.
वास्को ते कारवार : दु. 15.40, मडगाव ते कारवार : सकाळी 6, 6.30, 7, दु. 12.30, 13.45, 14.40, सायं. 17.30, 18.30 / 19, मडगाव ते गोकर्ण : दु. 13, पणजी ते बेळगाव : सकाळी 8, दु. 13.30, वास्को-मडगाव-बेळगाव : सकाळी 7, मडगाव ते बेळगाव : दु. 15.30 तर परतीच्या वेळा बेळगाव वरून : सकाळी 7, 8, दु. 13, 14 आहेत.
प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कदंब महामंडाळाचे महाव्यवस्थापक संजय घाटे यांनी केले आहे. दरम्यान घाटे यांच्याशी संपर्क साधला असता, आजपासून कारवारला सहा, बेळगावला चार बसेस धावतील. या बसेसमध्ये सुरक्षित अंतर आदी उपाययोजना केल्या जाणार आहेत, असे सांगितले.
महाराष्ट्र सेवा सोमवारपासून?
महाराष्ट्र राज्याने अद्याप मार्ग खोललेला नाही. बहुदा ते सोमवारपासून खुला करतील. त्यानंतर आम्ही महाराष्ट्रात देखील बसेस सुरू करू, असे संजय घाटे म्हणाले. सध्या गोव्यात 206 बसेस चालू आहेत. मात्र प्रत्येक बसमध्ये सामाजिक सुरक्षा अंतर ठेवावे लागत असल्याने कदंबला तोटा झाला आहे.