चोर्ला मार्गावरील वाहतूक सुरुच राहणार
प्रतिनिधी / वाळपई
सत्तरी तालुक्मयांमध्ये कोरोना रुग्ण आढळून केरी भागामध्ये सोमवारपासून चार दिवस पूर्णपणे टाळेबंदी हाती घेण्यात येणार आहे. यासंदर्भात परिसरातील दुकानदारानी स्वतः निर्णय घेतला असून यासंदर्भाची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या टाळेबंदीच्या काळात परिसरातील सर्व दुकाने अस्थापना बँका पूर्णपणे चार दिवस बंद राहणार आहेत. मात्र सगळे केरी चोर्ला दरम्यानचा महामार्ग सुरूच राहणार असून याबाबत कोणत्याही प्रकारची आडकाठी करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयामध्ये दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे मोठय़ाप्रमाणात सतर्कता निर्माण झालेली आहे .याची गंभीर दखल घेत केरी भागातील दुकानदार व जागरूक नागरिकांनी यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे .यामुळे सर्व नागरिकांनी व दुकानदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन परिसरातील जागरुक नागरिकांनी केले आहे .साखळी केरी-चोर्ला मार्गावर सातत्याने वर्दळ असते. मात्रा टाळेबंदीच्या काळात यामहामार्गावर होणारी वाहतूक बंद राहणार नाही अशा प्रकारचे माहिती नागरिकांनी दिली आहे.