ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील पिंजोरा येथे झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांना यश आले. मागील 24 तासातली ही दुसरी चकमक आज पहाटे 3 वाजल्यापासून सूरु आहे.
दरम्यान, रविवारी हिजबूलचे 5 ते 6 दहशतवादी शोपियां जिल्ह्यातील रेबन गावातील एका घरात लपून बसले होते. त्या शोधमोहिमेदरम्यान काल 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारतीय जवानांना यश आले होते. लष्कराची 01 RR तुकडी, CRPF आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. त्यानंतर आज पहाटे पुन्हा पिंजोरा भागात शोधमोहीम राबवली असता दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले.