जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांची माहिती
प्रतिनिधी / हुक्केरी
लॉकडाऊन संपण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यासाठी बेळगाव जिह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे. आजपासून प्रत्येक गावातील घराघरात जाऊन कोरोना चाचण्या करण्यास प्रारंभ केल्याची अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.
हुक्केरी येथील क्मयारगुड्ड कोविड केअर सेंटरला सोमवारी जिल्हाधिकाऱयांनी भेट देऊन तेथील स्वयंपाकगृह, वैद्यकीय विभाग, कोविड चिकित्सा विभागाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी जिह्यात ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनारुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लॅब टेक्निशियन, तालुकास्तरीय टास्कफोर्सच्या पथकाद्वारे संसर्गाची लक्षणे असलेल्यांच्या घरी जाऊन जागीच कोविडची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कोरोना रुग्णांच्या चाचण्या आणि त्यांच्यावर उपचारांसाठी डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱयांना खेडयात नेण्यासाठी ‘डॉक्टरांनो गावाकडे चला’ हा उपक्रम हुक्केरी तालुक्मयातील हुल्लोळी गावापासून आजपासून राबवण्यात येणार आहे. बाधितांनी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखता येऊ शकतो. त्यामुळे ग्रामस्थांनी न घाबरता सरकारचे नियम पाळून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी तहसीलदार डॉ. डी. एच. हुग्गार, सीपीआय रमेश छायागोळ, अक्षरदासोहाचे सहाय्यक संचालक श्रीशैल हिरेमठ,आरोग्य अधिकारी उदय कुडची, समाजकल्याण अधिकारी उमेश सिदनाळ, बीईओ मोहन दंडीन, बी. एम नागनुरी, प्रवीण माळज, तलाठी एन. आर. पाटील आदी उपस्थित होते.