सावंतवाडी / प्रतिनिधी-
कलंबिस्त मळा येथील सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे जुनेजाणते निष्ठावंत कार्यकर्ते अशोक शंकर पास्ते (वय ७० वर्ष) यांचे सोमवारी निधन झाले. मनमिळावू शांत स्वभाव असून भजन नाट्य क्षेत्राची त्यांना फार आवड होती. समाजकारण-राजकारण यांच्या माध्यमातून त्यांनी आपले योगदान दिले होते. गावच्या विकासात त्यांचा वाटा होता. बांधकाम व्यवसायिक म्हणून त्यांनी काही काळ काम केले. पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. माजी सैनिक रमेश पास्ते व महादेव पास्ते यांचे ते भाऊ होत तर सावंतवाडी अर्बन बँकेचे अधिकारी दिनेश पास्ते व महेश पास्ते यांचे ते काका होत.