प्रतिनिधी / आजरा
आजरा – गडहिंग्लज मार्गावर आजरा सूतगिरणीनजीक झालेल्या अपघातात इब्राहीम महमद मुराद (वय ६७, नाईक गल्ली आजरा) यांचा मृत्यू झाला. आज मंगळवारी सकाळी आकराच्या सुमारास हा अपघात झाला.
इब्राहीम हे आपल्या एम – 80 मोपेडवरून गडहिंग्लज येथून आजऱ्याकडे येत होते. दुचाकी घसरून हा अपघात झाला.