हलगा-मच्छे बायपास येथे शेतकऱयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
जागतिक कृषी दिन 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. त्या निमित्ताने बेळगाव तालुका रयत संघटनेच्यावतीने हा कृषी दिन साजरा करण्यात येणार असून हलगा-मच्छे बायपास रोड येळ्ळूर येथे हा कार्यक्रम होणार आहे. तरी शेतकऱयांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कृषी दिनाचे महत्व शेतकऱयांना सांगण्यासाठी हा दिन साजरा करण्यात येणार आहे. शहापूर, बेळगाव, हलगा, जुने बेळगाव, वडगाव, अनगोळ, मजगाव, मच्छे या परिसरातील शेतकरी व महिलांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे कळविण्यातआले आहे. बेकायदेशीररित्या करण्यात आलेल्या या रस्त्यावरच कृषी दिन साजरा करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.