पेट्रोल 84.64 तर डिझेल 76.28 वर पोहचले
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यात इंधनाच्या दरात मागील आठवडय़ाभरापासून सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी सलग सातव्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे किरकोळ विक्रीवर त्याचा परिणाम जाणवत आहे. शनिवारी बेळगावमध्ये पेट्रोलचा दर 84.64 तर डिझेलचा दर 76.28 रूपयांवर पोहचला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्य होरपळू लागले आहेत.
कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ होताच त्याचा परिणाम किरकोळ इंधन विक्रीवर होतो. मागील शनिवारपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात काही प्रमाणात वाढ होत आहे. 15 ते 20 पैशांची ही वाढ होत असली तरी ती आता मागील दरापेक्षा रूपयाने वाढली आहे. दररोज सकाळी नवे दर लागू होत असतात. त्याप्रमाणे दिवसभर पेट्रोल व डिझेलचे दर आकारले जातात. इंधनाच्या साठय़ापासून पेट्रोल पंपांच्या अंतरावरही पेट्रोलचे दर अवलंबून असतात.
मागील आठवडय़ापासून इंधनाच्या दरात काही प्रमाणात वाढ होत आहे. शनिवारी बेळगावमध्ये किरकोळ पेट्रोलची विक्री प्रतिलिटर 84.64 रूपये दराने केली जात होती. तर डिझेलची विक्री 76.28 रूपये दराने केली जात होती. मागील अनेक दिवसांपासून स्थिर असणारे पेट्रोलचे दर आठवडय़ाभरापासून पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे हे दर असेच वाढत राहिल्यास वाहन चालकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.
वाहतूक व्यवस्थेवर जाणवतोय परिणाम
लॉकडाऊननंतर 6 महिने उलटले तरी अद्याप वाहतूक व्यवस्था सुरळीत झालेली नाही. मालवाहक वाहने पुर्ण क्षमतेने भरलेली नसताना वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे साहित्याची वाहतुकीसाठी अधिकचे पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यातच आता इंधनाचे दर वाढल्याने वाहतूकीचे दर अजून वाढविले जाण्याची शक्मयता आहे.