नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी लवकरच भारतात आणीबाणी लागू केली जाणार आहे, तसेच सेनेला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे, अशा अनेक अफवा सध्या समाजमाध्यमांवरून उठविण्यात आल्या असून त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र भारतीय सेनेने ट्विटरवर संदेश टाकून या सर्व आफवांचे स्पष्ट शब्दांमध्ये खंडन केले आहे. अशा दिशाभूल करणाऱया वृत्तांवर कोणीही विश्वास ठेवू नये. देशात आणीबाणी घोषित होण्याची शक्यता नाही, असे या संदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.