रिक्षा व्यावसायिकांपासून केली सुरुवात
प्रतिनिधी / बेळगाव
गुगल पे, फोन पे च्या धर्तीवर पोस्ट विभागाने ‘डाक पे’ ही डिजिटल पेमेंट सुविधा सुरू केली आहे. बेळगाव शहरात या सेवेचा प्रारंभ बुधवारपासून झाला. धारवाड विभागाच्या मुख्य पोस्टमास्तर वीणा श्रीनिवास यांच्या हस्ते पहिले रेल्वेगेट येथील रिक्षास्टँडपासून या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.
पोस्ट विभागाच्यावतीने डाक पे चे क्मयुआर कोड बसविण्यात येणार आहेत. त्याद्वारे ग्राहकांना डिजिटल व्यवहार करता येणार आहेत. बेळगावमधील रिक्षाचालकांना क्मयुआर कोड देण्यात येत आहेत. त्यांना क्मयुआर कोडबाबत माहितीही देण्यात आली आहे. ग्राहकांना आता सुटय़ा पैशांसाठी तडजोड न करता भाडय़ाचे पैसे थेट रिक्षाचालकांच्या खात्यामध्ये देता येणार आहेत.
शुभारंभप्रसंगी वीणा श्रीनिवास म्हणाल्या, बेळगावमधील 10 हजार रिक्षांवर असे क्मयुआर कोड लावण्यात येणार आहेत. यामुळे ग्राहक व रिक्षाचालकांना याचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी बेळगाव विभागाचे पोस्ट अधीक्षक एच. बी. हसबी, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.