प्रतिनिधी/ बेळगाव
कोविड-19 चा धोका आणि लॉकडाऊनचा टप्पा शैक्षणिक प्रणालीवर खूप मोठा परिणाम करणारा ठरला आहे. यामुळे शिक्षणक्षेत्रात ऑनलाईन शिक्षणाचे वारे वाहताना दिसत आहे. याचाच आढावा घेत शिक्षणप्रणालीचा महत्त्वपूर्ण घटक असणाऱया शिक्षकांनाच ऑनलाईन शिक्षणाचे तंत्र शिकविण्यासाठी डाएटतर्फे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. दि. 1 जूनच्या मुहूर्तावर तालुकास्तरावरील ऑनलाईन कार्यशाळेला प्रारंभ झाला आहे. यामुळे लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम करणारे शिक्षक ऑनलाईन ऍक्टीव्ह झाले आहेत. जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पाडल्यानंतर तालुकास्तरावर विषयनिहाय शिक्षकांसाठी ऑनलाईन शिक्षणप्रणाली राबविली जात आहे.
कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांना शाळास्तरावर मार्गदर्शन करणे कठीण असून शाळा नेमक्मया कधी सुरू होणार, याबाबत अनिश्चितता आहे. यामुळे पुढील धोका ओळखत शिक्षकांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी ऑनलाईन शिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्याध्यापक, विषय शिक्षक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक अशा प्रत्येकासाठी ऑनलाईन कार्यशाळेतून मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिक्षण विभागातर्फे प्रत्येक शैक्षणिक वर्षात शिक्षणातील बदलांचा आढावा घेत शिक्षकांना अपडेट ठेवण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन केले जाते. मात्र कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक अंतर राखले जावे, यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन प्रणाली अवलंबिली जात आहे. यामुळे विभागवार गटनिहाय शिक्षक सध्या ऑनलाईन प्रशिक्षणात गुंतल्याचे चित्र दिसत आहे.
डाएटतर्फे आयोजन
शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी डाएटतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. यानुसार संबंधित शिक्षकांना कॉन्फरन्सच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. यामुळे परगावी तसेच इतर तालुक्मयात, जिल्हय़ात अडकलेल्या शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षणाचा लाभ घेणे शक्मय होत आहे. शिक्षकांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी विभागाने सध्याच्या परिस्थितीत प्रशिक्षणाचा घाट घातला असून अडचणी असंख्य असल्या तरी अंमलबजावणी सुरू झाली आहे.