बदलत्या तंत्रज्ञानासोबत बँकिंगमध्येही परिवर्तन
नवी दिल्ली
देशामध्ये विविध प्रकारच्या देवाणघेवाणीत आता मोबाईलचा समावेश खुप महत्वपूर्ण ठरत आहे. यामध्ये मोबाईलवर स्वस्त इंटरनेट सेवा आल्याचा परिणाम म्हणून बँकिंग व्यवहार सर्वात वेगाने बदल गेल्याचे चित्र गेल्या काही दिवसात निर्माण झाले आहे. एटीएममधून रोख रक्कम काढून त्याचा वापर करण्यात काही प्रमाणात घट झाली आहे. दुसरीकडे मोबाईल बँकिंग आणि मोबाईल वॉलेटच्या मदतीने करण्यात येणारी देवाणघेवाण वेगाने वाढत आहे.
मोबाईल बँकिंग
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार चालू वर्षातील मार्च महिन्यापर्यंत बँक खात्यांमधून एकूण देवाण घेवाण ही 65.8 हिस्सेदारी ही मोबाईल बँकिंगची राहिली आहे. एटीएमच्या मदतीने फक्त 15.96 टक्के व्यवहार झाले आहेत.