नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
कुस्तीपटू सागर राणा याच्या हत्येप्रकरणी भारतीय ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमार सध्या तिहार जेलमध्ये आहे. नुकतीच, दिल्ली न्यायालयाने सुशील कुमारची विशेष जेवण आणि कुस्तीपटूचा आहार मिळण्याची मागणी फेटाळून लावली होती. आता सुशील कुमारने एक नवीन मागणी केली आहे. सुशीलने टीव्हीची मागणी केली आहे. तुरुंग अधिकाऱ्यांनीच याबद्दल माहिती दिली आहे.
सुशील कुमारने त्याच्या वकिलांमार्फत अशी विनंती केली आहे की त्याला बरॅकमध्ये टीव्ही हवा आहे. शुक्रवारी त्याने यासंदर्भातला अर्ज दिला आहे. तुरुंगाबाहेर आणि विशेषत: कुस्तीविश्वात काय घडतंय, याविषयीची माहिती मिळण्यासाठ तिहार तुरुंगाचे डीजी संदीप गोयल यांनी दिली आहे.
कुस्तीपटू म्हणून करिअर पुढेही सुरू ठेवण्यासाठी तुरुंगात आपल्याला कुस्तीपटूसाठीचा आहार मिळण्याची विनंती नुकतीच सुशील कुमारने दिल्ली विशेष न्यायालयाकडे केली होती. यामध्ये प्रोटीन देणाऱ्या हेल्थ सप्लिमेंट्स, ओमेगा-३ कॅप्सुल्स, जॉइंटमेंट कॅप्सुल्स, प्रि-वर्कआऊट सी-४, मल्टिव्हिटॅमिन जीएनसी आणि एक्सरसाईज बँड यांचा समावेश होता. मात्र, कोर्टाने त्याची ही मागणी फेटाळून लावली होती.