वृत्तसंस्था/ डॉर्टमंड
येथे सुरू असलेल्या स्पार्कसन बुद्धिबळ करंडकासाठी होत असलेल्या चार डावाच्या लढतीतील ग्रॅण्ड मास्टर विश्वनाथन आनंद आणि ग्रॅण्डमास्टर क्रॅमनिक यांच्यातील तिसरा डाव बरोबरीत राहिला.
चार डावांच्या या लढतीत भारताच्या विश्वनाथन आनंदने क्रॅमनिकवर 2-1 अशी आघाडी मिळविली आहे. उभयतामधील तिसरा डाव 61 चालीनंतर बरोबरीत राहिला. या डावामध्ये पांढऱया मोहरा घेवून खेळणाऱया आनंदने इंग्लीश बचाव तंत्राचा वापर केला होता. आनंद आणि क्रॅमनिक यांच्यातील बुधवारी दुसरा डाव बरोबरीत राहिला होता तर आनंदने मंगळवारी पहिला डाव जिंकून क्रॅमनिकवर आघाडी घेतली होती. गेल्या आठवडय़ात झाग्रेब येथे झालेल्या क्रोएशिया ग्रॅण्ड बुद्धिबळ टूर स्पर्धेत आनंदने रॅपिड व ब्लिट्झ या दोन्ही प्रकारात मिळून दुसरे स्थान मिळविले होते.