प्रतिनिधी/ पणजी
जिल्हा पंचायत निवडणुकीमुळे आचारसंहिता लागु करण्यात आले असल्याने आपतर्फे सुरु करण्यात आलेले विज आंदोलन व त्यातील सभा तत्काळ पुढे ढकलण्यात आले आहे. परंतु जानेवारी 2021 मध्ये पुन्हा हे आंदोलन सुरु करण्यात येणार असून जिथे आपचे नेते संदेश तेळेकर याला अटक करण्यात आले होते त्याच वाळपई मतदारसंघातुन सुरुवात करण्यात येईल. दरम्यान मीच येथे सभेला संबोधणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मला अटक करुन दाखवावे. असा इशारा आपचे दिल्लीतील आमदार तथा राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप सरकार ‘आप’ ला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे व लोक ज्या प्रकारे वीज आंदोलनात सहभागी होत आहेत ते पाहून पूर्णपणे गडबडून गेले आहे. त्यामुळे भाजपा सरकार त्यांच्या विज आंदोलन मोर्चाच्या ठिकाणी पोलिसांना पाठवून या आंदोलनात विघ्न घालण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आप पक्ष अशा प्रकारच्या दबावाला घाबरणार नाही. असे चढ्ढा यांनी पुढे सांगितले.
वीज आंदोलनामुळे हे उघड झाले आहे की गोव्यातील लोक जास्त वीज बिलांनी कंटाळले आहेत आणि दिल्लीत आप ने पुरविल्याप्रमाणे त्यांना वीज हवी आहे. आतापर्यंत मिस्ड कॉलद्वारे 1.65 लाख गोयंकरांनी आप’ला पाठिंबा दर्शविला आहे, तर 73 हजारांहून अधिक लोक वैयक्तिकरित्या कॉलद्वारे. तसेच 2.62 लाख लोकांनी जनमत पाठविले आहे. लोक आमच्यासोबत आहे हे दिसून येत आहे. येणाऱया निवडणूकीत आपचे सरकार गोव्यात आले तर 48 तासांच्या आत 200 युनिटर्पंत विज मोफत देणार आहोत. असेही चढ्ढा यांनी अधिक बोलताना सांगितले.