पवारसाहेबांनी केले पुन्हा आमदार
प्रतिनिधी/ सातारा
जावली तालुक्यातील माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांची राजकीय घौडदौड सुरू आहे.जावली खोयापासून आमदारकीला झालेली सुरुवात कोरेगावात तशीच सुरू होती.नुकतीच त्यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांनी आज आमदारकीची शपथ घेतली आहे.पक्षाचे सर्व्हेसर्व्हा शरद पवार यांनी त्यांना पुन्हा आमदार केले.आज सायकांळी 8 वाजता आमदार शशिकांत शिंदे हे लाईव्ह येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.
वाशीत माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवता सोडवता जावली तालुक्याचे राष्ट्रवादीचे पहिले आमदार शशिकांत शिंदे हे झाले.तेव्हापासून त्यांचे राजकिय पटलावर स्वतःची एक वेगळी छाप निर्माण केली आहे आक्रमक बाणा, वक्तृत्व कॉशल्य, समाजासाठी कार्य करण्याची असलेली तळमळ यामुळे जावळी तालुक्यातील जनतेने त्यांना उचलून घेतले.1999 आणि 2004 ला जावलीतून आमदार तर त्यानंतर कोरेगावातून जनतेने आमदार म्हणून निवडून दिले.गत पंचवार्षिकमध्ये सत्ता नसताना ही त्यांनी जिह्यातील पक्षाचे अस्तित्व ठेवून त्यामध्ये भर घालण्याचे काम केले.फडणवीस सरकारच्या विरोधात त्यांनी जिह्यातील अनेक आंदोलने केली.मराठा क्रांती मोर्चात महत्वाचा वाटा उचलला.लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाची बाजू खंबीरपणे पेलली.धडाडती तोफ जावलीचा ढाण्या वाघ एखाद्याचा कार्यक्रम करतो म्हणून करणारच, हे त्यांच सूत्र.समाजाच्या कामासाठी त्यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते.आता खासदार शरद पवार यांनी पुन्हा त्यांना आमदार केले आहे.त्यांनी नुकतीच आमदारकीची शपथ घेतली आहे.विशेष म्हणजे आजच रात्री 8 वाजता ते फेसबुकवर लाईव्ह येऊन संवाद साधणार आहे.कार्यकर्त्याना उत्सुकता लागून राहिली आहे.
जिह्यात संभाजी ब्रिगेडला येणार उर्जित अवस्था
सातारा जिह्यात संभाजी ब्रिगेड एवढी कार्यतत्पर नव्हती.आता मात्र अमोल मिटकरी हे आमदार झाल्याने त्यांच्याकडून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना बळ मिळण्याची शक्यता आहे.जिह्यातील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्त्यांमध्ये खांदे पालत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.