वार्ताहर/ कास
कोरोनामुळे देश लॉकडाऊनमध्ये असताना पर्यस्थळांकडे जाण्यासही बंदी आहे मात्र गेल्या चार पाच दिवसांमध्ये कास रोडवर पर्यटकांची वर्दळ वाढल्याचे दिसुन येत असुन लॉकडाऊनची ऐशी तैशी होताना दिसत आहे
सध्या कोरोनामुळे सर्वत्र कडक लॉकडाऊन आहे. पर्यटन स्थळे ओस पडू लागली आहेत. मात्र सातायात प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सातारा शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर सर्वांना पेट्रोल दिले जात आहे. याचाच गैरफायदा घेत सातायातील काही हौशी लोक कास रस्त्यावर फिरायला गर्दी करू लागले आहेत. त्यात प्रेमी युगुल देखील कमी नाहीत त्यांची देखील गर्दी या परिसरात दिसू लागली आहे.चार चाकी वाहनांमध्ये दोन ते तीन व्यक्तींना परवानगी असताना सरसकट लोक या परिसरात जात आहेत. सातायातील काही उद्योगपतींनी या परिसरात जागा घेऊन हॉटेल व बंगले बांधले आहेत ते तर कायम सातायातुन ये जा करत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. ग्रामीण भागामध्ये कडक लॉकडाऊन चे नियम पाळले जात असून,एका गावातून दुस्रया गावात एकाही नातेवाईकांना इकडे तिकडे ये जा करण्यास परवानगी दिली जात नाही.
मात्र सातायातील लोकांची वर्दळ कास रस्त्यावर वाढल्याने एकीकडे भीती व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गेल्या आठ दहा दिवसांमध्ये पेट्रोल डिझेल सर्वांनाच मिळू लागल्याने आणी दारुची दुकानेही सुरू झाल्याने कास रोडवर काही पर्यटकांची व रोडवरील बंगले धारकांची वर्दळ वाढली असुन रात्रीच्या वेळी वाहनांची वर्दळ दिसुन येत आहे तर काही पर्यटक हॉटेल मध्ये चहा नाष्टा मिळेल का याचीही मागणी करत असुन यवतेश्वर घाट व कास रोड वर रात्रीच्या वेळी दारुच्या पाटर्याही झडत असल्याचे स्थानीक प्रवाशांच्या निर्दशनास येत असुन कास रोडवरील पर्यटकांची व हौशेनौशांची वर्दळ थांबवुन लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवणायांवर कारवाई करावी आशी मागाणी पारिसरातील नागरीकांतुन व्यक्त होत आहे