प्रतिनिधी/ सातारा
आमदार शशिकांत शिंदे हे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात.कोरोनाच्या काळात ही ते सतत लोकांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न करत असतात.सोमवारी दुपारी त्यांनी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या केबिनमधून आढावा घेत नागरिकांच्या समस्येवर लगेच सूचना देत सोडवल्या.
कोरोनाचा कहर वाढत असताना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह कित्येक मंत्री कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. एवढेच नाही तर सिल्व्हर ओक वरील सुरक्षा रक्षकास कोरोना झाल्याचे वृत्त झळकत असताना ही सातारा जिह्यातील राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे हे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी धडपडत आहेत.लोकांच्या गर्दीत जात आहेत.सोमवारी ते जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या केबिनमध्ये गेले.त्यांनी नागरिकांच्या समस्या एकूण अधिकायांना सुचना देत लगेच निपटारा केला.