आयपीओ 4,600 कोटीचा : 20 रोजी होणार बंद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रेल्वे वित्त महामंडळाकडून (आयआरएफसी) 4,600 कोटी रुपयांचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) येत्या 18 जानेवारीला खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
आयआरएफसीचा आयपीओ 4,600 कोटी रुपयांचा राहणार असून यांचे मूल्य साधारणपणे 25-26 रुपयांपर्यंत ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रेल्वेच्या बिगर बँकिंग वित्तीय कंपनीचा हा पहिलाच आयपीओ राहणार आहे. आयपीओ 20 जानेवारी रोजी बंद होणार आहे. जानेवारी 2020 मध्ये आयआरएफसीने आयपीओसाठी दस्ताऐवज जमा करुन घेतले आहेत. या आयपीओत 178.20 कोटी रुपयांचे समभाग राहणार आहेत. याच्यासह 118.80 कोटी रुपयांचे नवीन समभाग सादर करण्यात येणार आहेत. यासोबतच सरकार 59.40 कोटी समभागांच्या विक्रीचे सादरीकरण करणार आहे.
आयआरएफसीचा प्रवास
आयआरएफसीची स्थापना 1986 रोजी झाली होती. कंपनीचा प्रमुख व्यवसाय हा आर्थिक बाजारातून रक्कम उभारुन अधिग्रहणासाठी तिचा वापर करणे हा आहे. यानंतर सदरची संपत्ती भारतीय रेल्वेला दिली जाते. केंद्रीय मंत्रिमंडळाने एप्रिल 2017मध्ये रेल्वेच्या पाच कंपन्यांना सुचीबद्ध करण्यास मंजुरी दिली होती. यामध्ये चार कंपन्या आहेत, इरकॉन इंटरनॅशनल लि., राइट्स लि., रेल्वे विकास महामंडळ लि. आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टूरिझ्म कॉर्पोरेशन ज्या अगोदरच सूचीबद्ध झाल्या आहेत.