राजीनामा न घेतल्यास आंदोलन करण्याचा आमदार चंद्रकांत पाटीलांनी दिला इशारा
प्रतिनिधी/काेल्हापूर
तरूणीने केलेला बलात्काराचा आरोप व अनैतिक संब्ंधांतून असलेल्या दोन अपत्यांची नोद न करता निवडणूक आयोगाच्या डोळय़ात धूळफेक करणार्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा राज्य सरकारने राजीनामा घेतला नाही तर भाजप तीव्र आंदोलन करेल असा इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला. मुंडे यांच्यावरील गंभीर आरोपप्रकरणी पोलिस राज्यसरकारच्या दबावाखाली तपास करत असल्याचा हल्लाबोलही आमदार पाटील यांनी केला. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत आमदार पाटील यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
आमदार पाटील म्हणाले, सरकारमधील अशा बेकायदेशीर व अनैतिक वर्तन करणार्या मंत्र्यांचे समर्थन मुख्यमंत्री करणार असतील तर या चुकीला जनता कधीच माफ करणार नाहीत. त्यामुळे आधी पोलिसांनी मुंडे यांना अटक करावी आणि त्यानंतर तपास करावा. गेल्या 50 वर्षात शुदध् राजकारण केले असे म्हणणारया शरद पवार यांनी राष्ट्रवादीत असलेल्या अशा अशुदध् प्रवृत्तीच्या नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार का असा प्रश्नही आमदार पाटील यांनी केला.
बॉलिवूडमध्ये काम मिळवून देतो असे सांगून मंत्री मुंडे यांनी शारीरीक अत्याचार केल्याचा आरोप एका तरूणीने मुंडे यांच्यावर केला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळ हादरून गेले आहे. महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते असलेले मुंडे सामाजिक न्याय मंत्री असल्याने या प्रकाराने आता मुख्यमंत्री काय निणय घेणार याचीही चचा सुरू झाली आहे. या पाशर्वभूमीवर भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याचे आमदार पाटील यांच्या मागणीने स्पष्ट केले आहे.