प्रतिनिधी /बेळगाव
केएलएस आयएमईआर एमबीएतर्फे 2021-23 साठी आरंभ दि ओरिएंटेशन प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. आझादी का अमृतमहोत्सव यावर आधारीत हा कार्यक्रम होता. पुढील 25 वर्षांत भारताच्या विकासामध्ये तरुणांची भूमिका त्यावर आधारलेले उद्योग व शैक्षणिक क्षेत्र या विषयावर विविध मान्यवर मंडळींनी मार्गदर्शन केले.
हुबळी येथील देशपांडे स्टार्टअपचे सीईओ बेंजामिन मॅथ्यू यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना भारतातील स्टार्टअपच्या उदयोन्मुख संधी आणि तरुण याविषयी मार्गदर्शन केले. गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन आर. एस. मुतालिक-देसाई हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. केएलएस आयएमईआरचे संचालक डॉ. एस. जी. चिनिवार यांनी स्वागत केले. डॉ. शैलजा हिरेमठ यांनी आभार मानले.
आरंभच्या चार दिवसांच्या सत्रात संस्थेची ओळख, कमल बस्तीची भेट, उद्योजक विनायक लोकूर, पुणे येथील उद्योजक नितीन वाघ, उद्योगतज्ञ सुनीता यांचे मार्गदर्शन या सत्रात झाले. सचिन सुभेदार यांनी योगविषयी विद्यार्थी व कर्मचाऱयांना माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी कॅम्पसमध्ये गांडूळ खत युनिट बसविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.