ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं आज ‘आयएस’च्या तीन संशयित दहशतवाद्यांना वजीराबादच्या चकमकीनंतर अटक केली. त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. या तिघांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे.
राजधानी दिल्लीत आयएस या दहशतवादी संघटनेच्या मोडय़ूलचा दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं पर्दाफाश केला आहे. तिघांना पकडण्यात आलं आहे. हे तिघेही आयएसचे संशयित दहशतवादी असल्याचं सांगितलं जात आहे.
सध्या दिल्लीत ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. तसंच प्रजासत्ताक दिनही जवळ येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर हायअलर्टवर आहे.