वृत्तसंस्था/ मुंबई
देशामध्ये म्युच्युअल फंड व्यवसायात आयडीएफसी 9 व्या नंबरची कंपनी आहे. कंपनीचा असेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) जून तिमाहीत 1.26 लाख कोटी रुपये होता. यात 27 हजार कोटी रुपये इक्विटीचा एयूएम आहे. अन्य डेट व हायब्रिड योजनेत आहेत. आयडीएफसीच्या संचालक मंडळाने यांच्यासाठी एक पॅनल तयार केले असून जे इन्वेस्टमेंट बँकरची नियुक्तीसह प्रत्येक प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
2018 पासून तयारीत
वर्ष 2018 पासून आयडीएफसी म्युच्युअल फंडची विक्री करण्यात येणार असल्याची चर्चा होती. परंतु तेव्हा मूल्य अधिक राहिल्याने व्यवहार होण्यास अडचणी निर्माण होत होत्या. तेव्हापासून संचालक मंडळ मूल्यासह त्याचा व्यवहार करण्याच्या शोधात राहिले असल्याची माहिती आहे.
एयूएमवर आधारीत मूल्यांकन
म्युच्युअल फंड बिझनेसचे मूल्यांकन त्याच्या एयूएमवर आधारीत होते. एयूएमच्या तुलनेत 5 ते 6 टक्क्यांच्या मूल्यावर हा व्यवहार केला जातो. इक्विटी आणि डेटमध्ये आयडीएफसी जवळ चांगली मॅनेजमेंट टीम आहे.
देशात फायदा कमविणाऱया कंपन्या
प्रमुख फंड हाऊसमध्ये स्टेट बँक म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रूडेंशियल, एचडीएफसी म्युच्युअल फंड, निप्पोन इंडिया, कोटक महिंद्रा म्युच्युअल फंड, बिरला म्युच्युअल फंड आदींचा समावेश राहिला आहे.