नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचे अव्वल पंच नितीन मेनन व त्यांचे ऑस्ट्रेलियन सहकारी पॉल रॉफेल यांनी यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून कोरोनामुळे माघार घेतली आहे. नितीन मेनन यांची पत्नी व आई अशा 2 सदस्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने ते तातडीने इंदोरला रवाना झाले. पॉल रॉफेल हे मात्र ऑस्ट्रेलियाने भारताकडील विमानसेवा पूर्णपणे बंद केली असल्याने भारतातच अडकून पडले आहेत. नितीन मेनन हे आयसीसी इलाईन पॅनेलमधील एकमेव भारतीय पंच असून अलीकडेच भारताच्या इंग्लंडविरुद्ध मायदेशातील मालिकेदरम्यान मेनन यांच्या पंचगिरीचे विशेष कौतुक झाले होते.