दुबई
13 वी आयपीएल क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये पुढील महिन्यात खेळविली जाणार असून या स्पर्धेचे वेळापत्रक येत्या 24 तासात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जाहीर करणार आहे. यासंदर्भात बीसीसीआयचे सदस्य आणि अमिरात क्रिकेट मंडळाचे प्रमुख शेख नेहान बिन मुबारक यांच्यात बैठक झाली.
2020 आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित करण्याकरिता गुरूवारी सायंकाळी दुबईत दाखल झालेले बीसीसीआयचे सदस्य आणि अमिरात क्रिकेट मंडळाचे प्रमुख यांच्यात बैठक झाली. कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करताना क्रिकेटपटूंच्या आंतर शहर प्रवास प्रोटोकॉल मधील येत असलेल्या समस्यांचे निवारण ईसीबीच्या प्रमुखांनी केले. कोरोना संदर्भातील नियमावलींचे पालन करताना दुबई आणि अबुधाबी यांचे स्वतंत्र प्रोटोकॉल असल्याने समस्या निर्माण झाली होती.