नवी दिल्ली
ऑनलाईन फार्मसी प्लॅटफॉर्मवर फार्मईजीच्या मालकीची असणारी कंपनी एपीआय होल्डिंग्सने प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) मदतीने 6,250 कोटी रुपये उभारण्यासाठी भांडवली बाजारातील नियामक सेबीकडे अर्जांतर्गत आपली कागदपत्रे सादर केली आहेत.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओअंतर्गत संपूर्णपणे ताजे समभाग जारी करणार आहे. कंपनी 1,250 कोटी रुपयाचे इक्विटी समभागांना खासगी तत्वावर सादर करण्याची शक्यता आहे. कंपनी आयपीओच्या मदतीने 1,929 कोटी रुपयाचे थकीत कर्जाची परतफेड करण्यासह अन्य व्यवहार पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आहे.