गेल्या आर्थिक वर्षापेक्षा यंदा बोनसची रक्कम 15 टक्के जास्त
वृत्तसंस्था/ मुंबई
‘आयसीआयसीआय प्रुडेन्शीयल लाइफ इन्शुरन्स’ने आपल्या ‘पार्टिसिपेटिंग पॉलिसीं’साठी एकूण 788 कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. कंपनीच्या ‘पार्टिसिपेटिंग’ पॉलिसीधारकांच्या निधीतून मिळणाऱया नफ्यातील वाटा म्हणजे हा बोनस आहे. 31 मार्च 2020 रोजीपर्यंत कंपनीकडे असणाऱया सर्व पॉलिसी या बोनससाठी पात्र आहेत. या बोनसची रक्कम पॉलिसीधारकांना मुदतीनंतरच्या हमी दिलेल्या परताव्यामध्ये किंवा मृत्यूच्या लाभामध्ये जोडण्यात येईल.
बोनस जाहीर करून पॉलिसीधारकांना दीर्घकालीन लाभ मिळवून देण्याचे कंपनीचे हे सलग 14 वे वर्ष आहे. वित्तीय वर्ष 2020 साठी जाहीर केलेला हा बोनस मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्मयांनी अधिक आहे. यातून सुमारे 9 लाख पॉलिसीधारकांना त्यांची आर्थिक उद्दिष्टय़े गाठण्यासाठी एक पाऊल पुढे जाता येईल.
‘पार्टिसिपेटिंग’ विमा योजनांमुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या भांडवलाची सुरक्षितता मिळते, त्याशिवाय आर्थिक उद्दिष्टय़े पूर्ण करण्यासाठी त्यांची बचत मोठय़ा प्रमाणावर जमा होते. गेल्या आर्थिक वर्षात या स्वरुपाची ‘लक्ष्य’ या नावाच्या योजनेत भांडवल सुरक्षिततेची व बचत निर्मितीची वैशिष्टय़े आहेत. आयुष्याच्या सुरुवातीपासून पैशाची बचत करणाऱयांसाठी ही योजना लाभकारक आहे.