नवी दिल्ली
अमेरिकास्थित आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणारी जॉन्सन अँड जॉन्सन यांनी आपल्या काही लोकप्रिय उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातही काही उत्पादने विक्रीस नसतील.
आशिया आणि मध्य पूर्वेकडील देशांमध्ये कंपनीची फेयरनेस उत्पादने आता विकली जाणार नाहीत. याअंतर्गत क्लिन अँड क्लिअर फेयरनेसची उत्पादने भारतात विक्री होणार नाहीत. जॉन्सन व्यतिरीक्त जगात वैयक्तिक काळजीची महिलांसाठी युनिलीव्हर, प्रॉक्टर अँड गॅंबल, लोरियल अशा कंपन्यांचीही उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत.