प्रतिनिधी/ सातारा
आरटीओ कार्यालय परिसरातील फुटपाथवर पुन्हा एजंटच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे लायन्स काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या एजंटला येथून हटवण्यात आले होते. तरीही त्यांनी पुन्हा येथे अतिक्रमण केले आहे. यामुळे यांना कोणाचे वरदस्त आहे. अशी चर्चा रंगु लागली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून गर्दी न करण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. मात्र आरटीओ कार्यालयाच्या परिसरात फुटपाथवर बसणाऱया एजंटच्या भोवती गर्दी वाढत आहे. लायसन्स काढण्यासाठी येणाऱया लोकांकडून सोशल डिस्टन्स नियमांचे उल्लघंन होत आहे. तर विनामास्क फिरणाऱयांची संख्याही येथे जात आहे. या ठिकाणी होणाऱया गर्दी ला बेक्र लागावा म्हणून या एजंटांना येथून हटवण्यात आले होते. तरीही पुन्हा याठिकाणी रांगा लावल्या आहेत. यामुळे यांचा अडथळा वाहतूकीस निर्माण होत आहे. याच्यावर ठोस कारवाईची गरज असताना संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढणार आहे.