काळय़ादिनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूकही दुसऱया मार्गाने वळविली
प्रतिनिधी /बेळगाव
आरपीडी क्रॉस येथे दोन महिन्यांपूर्वी नामांतर करून फलक लावण्याचा प्रयत्न काही कन्नड दुराभिमान्यांनी केला होता. त्यामुळे 1 नोव्हेंबर रोजी पुन्हा ही घटना घडण्याची शक्मयता वर्तवून आरपीडी क्रॉस येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी मराठी भाषिकांची अडवणूकही त्याठिकाणी करण्यात आली. तसेच वाहतूक दुसरीकडून वळविण्यात आली.
बेळगाव शहर हे मराठी शहर असल्यामुळे येथील मराठी नावे पुसून टाकण्यासाठी मूठभर कन्नडीग पोलीस संरक्षणात प्रयत्न करत आहेत. शहराची शांतता बिघडवत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे बऱयाचवेळा तणावाचे वातावरणही निर्माण होत आहे. 1 नोव्हेंबर हा काळादिन म्हणून बेळगावात पाळला जातो. तर काही कन्नड संघटनांचे मूठभर कार्यकर्ते राज्योत्सव साजरा करत असतात. त्यामुळे सर्वत्रच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आरपीडी क्रॉसजवळील वाहतूक एका बाजूने सुरू ठेवण्यात आली होती. या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे केवळ पाच ते सहा कार्यकर्त्यांनी लाल-पिवळय़ा रंगाचा झेंडा घेऊन गोवावेस सर्कल येथे धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषिकांच्या विरोधात पोलीस संरक्षणात गरळ ओकण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मराठी भाषिकांना हे समजले तर मोठा गोंधळ उडणार म्हणून मूठभर कार्यकर्त्यांना पोलिसांनी संरक्षणातच बाहेर नेऊन सोडले.
वाहतुकीची कोंडी करणाऱयांवर कारवाईची मागणी
लाल-पिवळय़ा रंगाचा बेकायदेशीर झेंडा घेऊन काही जण शहरात फिरताना दिसत होते. हा झेंडा अनधिकृत आहे, हे देखील त्यांना माहिती नाही. केवळ स्वतःचेच हसे करून घेण्याचा प्रकार पुन्हा एकदा दिसला. गोवावेस सर्कल येथे काहीवेळ आरडाओरड करून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न पाच ते सहा कन्नड कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे बराचवेळ वाहतुकीची कोंडी झाली. तेव्हा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
राजहंसगड परिसरातही पोलीस तैनात : जाणूनबुजून धुडगूस घालण्याचे प्रयत्न सुरुच
राजहंसगडावर काही कन्नडीगांनी मागील काही महिन्यांपूर्वी लाल-पिवळय़ा रंगाचा झेंडा घेऊन धिंगाणा घातला होता. त्यामुळे 1 नोव्हेंबर रोजी राजहंसगड परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काळादिन आणि कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पार्श्वभूमीवर हा पहारा ठेवण्यात आला.
राजहंसगड परिसरात पोलीस संरक्षणात काही मूठभर कन्नडीग धिंगाणा घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मराठी भाषिकांना आणि हिंदूंना दुखवण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राजहंसगडावर सिद्धेश्वर मंदिर आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी अनेक ऐतिहासिक बुरूज आहेत. तेव्हा त्या ठिकाणी जाणूनबुजून धुडगूस घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या परिसरात सर्वच मराठी भाषिक आहेत. त्यामुळे गोंधळ होण्याची शक्मयता असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.