सातत्याने प्रयत्न करूनही मृतदेहाची ओळख पटली नाही : वेगवेगळय़ा जिल्हय़ात तपास
प्रतिनिधी /बेळगाव
अथणी तालुक्मयातील हल्ल्याळजवळ रस्त्याशेजारी बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या व उपचाराचा उपयोग न होता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या बालिकेच्या खुनाचे गूढ तब्बल सव्वा महिन्यानंतरही कायम आहे. पोलीस दलाने सातत्याने प्रयत्न करूनही मृतदेहाची ओळख पटविणे शक्मय झाले नाही.
23 सप्टेंबर रोजी जत-जांबोटी रस्त्याला लागून अडीच वर्षांची बालिका बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. तिच्या नाकापासून पाठीपर्यंत भाजलेल्या जखमा होत्या. तिला तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. 30 सप्टेंबर रोजी या बालिकेचा मृत्यू झाला.
अथणी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करून घेऊन पोलिसांनी तपास हाती घेतला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके या प्रकरणाच्या तपासासाठी महाराष्ट्राला रवाना झाली होती. बेळगावसह जिल्हय़ाला लागूनच असलेल्या वेगवेगळय़ा जिल्हय़ात पोलिसांनी तपास केला.
किमान खून झालेल्या बालिकेची ओळख पटविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. मात्र या प्रयत्नांना यश आले नाही. बालिकेची अद्याप ओळख पटली नाही. तिच्या अंगावरील जखमा पाहता काळय़ा जादूसाठी हा प्रकार घडला असावा का? असा संशय बळावला आहे. त्या दिशेनेही तपास करण्यात येत आहे. मात्र मृतदेहाची ओळख पटली नाही. यामुळे तिचा खून कोणी केला? याचा उलगडा झाला
नाही.