वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या विळख्यामुळे मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जवळपास 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. याचा लाभ मेक इन इंडिया कार्यक्रमाला चालना देण्यासाठी होणार असल्याचा विश्वास उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्राला संबोधित करताना कोविड 19 संकटातून उभारण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दिलेल्या आर्थिक मदतीचा लाभ देशातील लहान मोठय़ा उद्योगांही होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. तरी सदर आर्थिक तरतूदीचा तपशील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिंदाल स्टील वर्क्स समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी दिलेल्या एका माहितीमधून लहान, मध्यम उद्योग, शेतकरी, करदाता आणि मध्यम वर्गाला आर्थिक पॅकेजमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.