शेअर बाजाराचे दोन्हीही निर्देशांक सरत्या आठवडय़ात चढत्या दिशेने धावताना दिसले. आरबीआयच्या पतधोरणाचेही शुक्रवारी बाजाराने स्वागत केले. गृहकर्जाबाबतचा आरबीआयचा निर्णय बँकांच्या समभागांना तेजी देणारा ठरला. वाहन उद्योग, सिमेंट, औषधे आणि रसायन उद्योग या चारही क्षेत्रात सध्या सुधारणांची गती दिसून येत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील समभागांची खरेदी भविष्यात फायदा देणारी ठरेल. गेल्या 11 सत्रांमध्ये निफ्टी 50 चा आलेख 1100 नी उंचावला आहे. आगामी काळात निफ्टीचा निर्देशांक 12,050 पर्यंत झेपावण्याच्या दाट शक्मयता आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचे स्वागत करत गतसप्ताहातील शेअर बाजाराच्या कामकाजाची सांगता झाली. अपेक्षेप्रमाणे हा आठवडा सलगवृद्धी नोंदवणारा ठरला. दोन्हीही प्रमुख निर्देशांकांनी एकाच दिवशी ‘उसळी’ घेतली नसली तरी सलग सातव्या सत्रात दिसून आलेली चढती भाजणी बरेच काही सांगून जाणारी आहे. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 326 अंकांनी म्हणजेच 0.81 टक्क्मयांनी वाढून 40,509 अंकांवर बंद झाला. विस्तारीत पाया असणाऱया राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 79 अंकांनी वाढून 11,914 अंकांवर बंद झाला. रिझर्व्ह बँकेने पतधोरणात रेपो दरात कोणताही बदल केलेला नसला आणि वाढत्या महागाईचा विचार करुन विकासावर लक्ष केंद्रित केलेले असले तरी घरासाठी बँकांकडून कर्जपुरवठा वाढवण्यासाठी जोखमीसंदर्भातील नियम शिथील केले आहेत. पतधोरणातून अर्थव्यवस्थेच्या आगामी काळाबाबत आशावादी सूर व्यक्त केले आहेत. याचे सुपरिणाम शेअर बाजारात तात्काळ दिसून आले. शुक्रवारी बँकिंग क्षेत्रातील समभागांची मोठय़ा प्रमाणावर खरेदी झाली. निफ्टी बँक निर्देशांक 655 अंकांच्या वाढीसह 23,486 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टीमध्ये विप्रो आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागांमध्ये प्रत्येकी चार टक्क्मयांची वाढ नोंदवली गेली. याखेरीज अŸक्सिस, एचडीएफसी, स्टेट बँक, एल ऍण्ड टी, ओएनजीसी आणि इन्फोसिसच्या समभागांतही वाढ नोंदवली गेली. तथापि, वाहनउद्योग आणि धातू क्षेत्रातील समभागात मात्र घसरण झाली.
जागतिक बाजारांमध्ये शांघायचा शेअर बाजार गतसप्ताहात सकारात्मक संकेत देत बंद झाला. हाँगकाँग आणि टोकियोतील शेअर बाजारात मात्र घसरण दिसून आली. ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमतीत 0.85 अंशांची वाढ होऊन त्या 42.97 डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचल्या आहेत; तर डॉलरच्या तुलनेत रुपया 8 पैसे बळकट होऊन 73.15 रुपये झाला आहे.
चालू सप्ताहात शेअर बाजारातील आनंदोत्सवाचे पर्व कायम राहण्याची शक्मयता आहे. बँकिंगच्या समभागांमध्ये तेजीचा सिलसिला या आठवडय़ातही कायम राहील. , केंद्र सरकारने मोरेटोरियमबाबतचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करताना याहून अधिक दिलासा देता येणार नाही असे म्हटले आहे. याचा बाजारावर कसा परिणाम होतो हे पाहावे लागेल. गृहकर्जदारांसाठीचा आरबीआयने दिलेला दिलासा रिअल इस्टेट आणि या क्षेत्राला वित्तपुरवठा करणाऱया कंपन्यांच्या समभागात सुधारणा घडवून आणेल. वाहनउद्योग, सिमेंट, औषधे आणि रसायन उद्योग या चारही क्षेत्रात सध्या सुधारणांची गती दिसून येत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील समभागांची खरेदी भविष्यात फायदा देणारी ठरेल. गेल्या 11 सत्रांमध्ये निफ्टी 50 चा आलेख 1100 नी उंचावला आहे. निफ्टीचा निर्देशांक 12,050 पर्यंत झेपावण्याच्या दाट शक्मयता आहेत.
मध्यम कालावधीचे लक्ष्य ठेवून लार्सन अँड टुर्बो – 908 (खरेदी)- 980 (लक्ष्य)- 870 (स्टॉपलॉस) , एचपीसीएल – 176 (खरेदी)- 197 (टार्गेट)- 168 (स्टॉपलॉस), डाबर इंडिया – 519 (खरेदी)- 570 (टार्गेट)- 495 (स्टॉपलॉस) या तीन समभागांची खरेदी करता येईल. याखेरीज गतशुक्रवारी टीसीएसच्या समभागात घसरण झाली आहे. तथापि, हा समभाग 2970 रुपये टार्गेट ठेवून खरेदी करावा. विप्रोच्या समभागात मोठी वाढ झाली आहे. विक्रीचा मारा होऊन हा समभाग घसरल्यास तो खरेदी करुन ठेवावा. एचसीएलचे समभाग सध्या 857 रुपयांवर आहेत. 875 चे टार्गेट ठेवून तो खरेदी करता येईल. याखेरीज 82 रुपये प्रतिसमभाग मूल्य असणारे जेएम फायान्शयिलचे समभागही 114 चे लक्ष्य ठेवून खरेदी करुन ठेवावेत.
शेअर बाजारात तेजीचा माहोल असला तरी स्मॉल कॅप आणि मिडकॅपमधील अनेक समभागांचे मूल्य वधारलेले नाही. त्यामुळे सेन्सेक्स वधारलेला असूनही अनेक गुंतवणूकदारांच्या चेहऱयावर हसू उमटलेले नाहीये. ही परिस्थिती आणखी महिनाभर तशीच राहील असे दिसते. याचे प्रमुख कारण बाजारावर असणारा विदेशी प्रभाव. या प्रभावाची दिशा अमेरिकन निवडणुकांनंतर स्पष्ट होईल. अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये ट्रम्प यांचा विजय झाला आणि विजयानंतर संभाव्य अघटित घटना घडल्या नाहीत तर शेअर बाजारात जोरदार उसळी दिसेल आणि तो प्रवाह पुढेही सुरु राहील. याउलट परिस्थिती घडली आणि अमेरिकेतील राजकीय-सामाजिक वातावरण बिघडले तर शेअर बाजारात मोठी घसरण होऊ शकते. त्यामुळे मागे म्हटल्याप्रमाणे सध्या एक महिन्याचे लक्ष्य ठेवून राहण्यापेक्षा अल्पसंतुष्ट राहा. आपली नुकसान सोसण्याची किंवा गुंतवणूक दीर्घकाळ ठेवण्याची क्षमता कमी असेल तर समभागांचे मूल्य किरकोळ वधारल्यानंतर विक्रीचा पर्याय निवडा. –
– संदीप पाटील