क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
केआर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित दुसऱया केआर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी चौथे प्रँचायझी म्हणून क्रिकेटप्रेमी आशिष चव्हाण व रवी पिल्ले हे लाभले आहेत.
मार्च महिन्यात होणाऱया केआर शेट्टी चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी संघटनेला चौथा प्रँचायझीच्या स्वरूपात बेळगावचे क्रिकेटप्रेमी आशिष चव्हाण व क्रिकेट प्रशिक्षक रवी पिल्ले हे लाभले आहेत. मार्गन्स या नावाने ते आपला संघ खेळविणार आहेत. आशिष चव्हाण हे क्रिकेटप्रेमी असून रवी पिल्ले यांनी यापूर्वी अनेक संघातून खेळताना मध्यमगती गोलंदाजीवर विजय मिळवून दिला होता. या दोघांचेही केआर शेट्टी आयोजन समितीचे चेअरमन प्रणय शेट्टी यांनी आशिष चव्हाण व रवी पिल्ले यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी राहुल दांडगरकर, शिवलिंग सनमान, पुनित शेट्टी, प्रशांत लायंदर आदी क्रिकेटपटू उपस्थित होते.