वृत्तसंस्था/ लंडन
येत्या गुरुवारपासून यजमान इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने सोमवारी चौदा जणांचा इंग्लंडचा संघ जाहीर केला. विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघामध्ये भरवशाचा फलंदाज ज्यो डेन्लीला संधी दिली आहे.
सध्या इंग्लंड आणि विंडीज यांच्यातील कसोटी मालिका खेळविली जात आहे. विंडीज विरुद्धच्या दुसऱया कसोटीत केंटचा फलंदाज डेन्लीला इंग्लंड संघातून वगळण्यात आल्यानंतर तिसऱया कसोटीतही त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले. पण आयर्लंड विरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी त्याचे इंग्लंड संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंडचे नेतृत्व मॉर्गनकडे सोपविण्यात आले असून अष्टपैलू मोईन अली उपकर्णधार राहील.
इंग्लंडचा संघ- मॉर्गन (कर्णधार), मोईन अली (उपकर्णधार), बेअरस्टो, बॅन्टन, बिलिंग्ज, टॉम करन, डॉसन, डेन्ली, साकीब मेहमूद, आदिल रशिद, रॉय, टॉप्ले, विन्स, डेव्हिड विली, राखीव खेळाडू- ग्लीसन, ग्रेगरी आणि लिव्हिंगस्टोन.