वृत्तसंस्था/ लंडन
चेल्सी फुटबॉल संघाने पुढील वषी होणाऱया चॅम्पियन्स लिग फुटबॉल स्पर्धेत आपला प्रवेश निश्चित केला. रविवारी येथे झालेल्या प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात चेल्सीने वूलव्हेसचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला.
रविवारच्या सामन्यात मॅसन माऊंटने पूर्वार्धात चेल्सीचे खाते स्टॉपेज टाईममध्ये उघडले. त्यानंतर तीन मिनिटांच्या कालावधीने ऑलिव्हर गिरॉडने चेल्सीचा दुसरा गोल नोंदवून वूलव्हेसचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. या सामन्यातील विजयामुळे चेल्सीने चौथे स्थान मिळवित पुढील वषी होणाऱया चॅम्पियन्स लिग स्पर्धेत आपला प्रवेश निश्चित केला. लिव्हरपूलने पहिले, मँचेस्टर सिटीने दुसरे व मँचेस्टर युनायटेडने तिसरे स्थान मिळविले आहे. प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेच्या प्रारंभी सलग पाचव्यांदा गोल नोंदविणारा 33 वर्षीय गिरॉड हा सर्वात वयस्कर फुटबॉलपटू ठरला आहे.