मँचेस्टर
यजमान इंग्लंड-पाकिस्तान यांच्यातील पहिली टी-20 लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करावी लागली. ओल्ड ट्रफोर्डवरील या लढतीत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 16.1 षटकात 6 बाद 131 धावा जमवल्या असताना पावसाचा व्यत्यय आला आणि त्यानंतर एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. इंग्लंडच्या टॉम बॅन्टमने यावेळी 42 चेंडूत 71 धावांची आतषबाजी केली होती.
बॅन्टमच्या या धुवांधार खेळीत 4 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. अर्थात, त्यापूर्वी यजमान संघाने 19 चेंडूत 14 धावांमध्येच 4 फलंदाज गमावले होते. दरम्यान, संततधार पावसामुळे खेळपट्टी ओलसर झाली. त्यामुळे, पाकिस्तानला 5 षटकांमध्ये सुधारित लक्ष्य देण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरले.