क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे लोयला पीयू कॉलेज येथे घेण्यात आलेल्या खुल्या शुटोकॉन कराटे स्पर्धेत बेळगावच्या इंडियन कराटे गोशुन कराटे क्लबच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.
या कराटे स्पर्धेत जवळपास 350 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये बेळगावच्या इंडियन कराटे गोशून कराटे क्लबच्या खेळाडूंनी यश संपादन केले आहे. आयान शेखने 5 फेऱया जिंकून प्रथम क्रमांक पटकावित चषक पटकाविले. शुभम मानेने द्वितीय क्रमांक पटकाविला. विक्रांत सुब्रमणीने चार फेऱया जिंकून द्वितीय क्रमांक, कुंदनमन परमार याने 3 फेऱया जिंकून तिसरा क्रमांक पटकाविला. या सर्व कराटेपटूंना पाहुण्यांच्या हस्ते आकर्षक चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वरील सर्व कराटेपटूंना कराटे मास्टर मधू पाटील, प्रकाश पाटील, आकाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.